भीम जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन ; अन्नदान, पाणी वाटप व रुबाब भीमाचा या भीमगीतांच्या कार्यक्रमाने होणार उत्सव साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 12 April 2025

भीम जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन ; अन्नदान, पाणी वाटप व रुबाब भीमाचा या भीमगीतांच्या कार्यक्रमाने होणार उत्सव साजरा

नांदेड, १२ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद नांदेडतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जिल्हा परिषद कार्यालय परिसरातून बँड पथकासह डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती  पुतळ्यास अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या अभिवादन सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती मेघना कावली प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मंजुषा कापसे, प्रशांत थोरात, नारायण मिसाळ, अमित राठोड, कार्यकारी अभियंते एस.जी. गंगथडे, ए.एन. भोजराज, राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, संवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माधव सलगर, एस.जे. अडबलवार, दिलीपकुमार बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

        यानंतर सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषद परिसरात अन्न व पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता रुबाब भीमाचा या भिमगीतांच्या विशेष सादरीकरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद परिसरात होणार असून, सुप्रसिद्ध गायक बापूराव जमदाडे व त्यांचा संच यावेळी सादरीकरण करणार आहेत.

          या सर्व कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिकारी-कर्मचारी संयुक्त जयंती महोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष रंजीत गजभारे, सचिव धनंजय गुम्मलवार, कार्याध्यक्ष राजेश जोंधळे, कोषाध्यक्ष सचिन चौदंते, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद व्यवहारे यांच्यासह जितेंद्र तोटलवार, राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, पवन तलवारे, लक्ष्मीकांत मोटरवार, शेख मुकरम, संतोष मठपती, बालाजी महाजन, विक्रम रेंगूनटवार, मंगेश ढेबरे, ज्ञानेश्वर वानखेडे, योगेश वाघ, शिवराज कोल्हे, महेश लोणीकर, उमाकांत हाळे, गजानन अगरमोरे, सतीश जकाते, राजू गोवंदे, शेख जाफर, राजरत्न ढोले, विजय कदम, आनंद सावंत, दीपक महालिंगे, बजरंग तेलंग, अल्केश शिरशेटवार, मुक्तेश्वर चिवडे, विजय थोरात, छाया कांबळे, बलजीत कौर, प्रेमला चौदते, गंगावनी आळंदीकर, इंदुमती वाघमारे, उज्वला गजभारे, कीर्ती मिवळे, शालिनी शेळके, गोविंद गज्जेवार तसेच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे, सचिव धोत्रे, धनंजय वडजे, मारुती वाडेकर संतोष राऊत इत्यादींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages