आंबेडकरवादी मिशन मध्ये अठरा तास अभ्यासाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिल रोजी आयोजन
नांदेड :
प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरवादी मिशन मध्ये 14 एप्रिल 2025 रोजी सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत सलग अठरा तास अभ्यास करून विद्यार्थी अभ्यासात्मक अभिवादन करतील .
गेल्या वीस वर्षापासून अभ्यासात्मक अभिवादनाचा कार्यक्रम दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या पुढाकाराने संपूर्ण देश पातळीवर आयोजित करण्यात येत आहे , त्याचे सातत्याने या वर्षी चालू ठेवण्यात येत आहे.
या वर्षी पुन्हा एकदा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देऊन 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी हा कार्यक्रम आयोजित करण्यातआला आहे.
विद्यार्थी पालक बुद्धिजीवी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आव्हान आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी केले आहे.
नाव न नोंदवता विद्यार्थ्यांनी सकाळी सहा वाजता आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे अभ्यासाचे साहित्य घेऊन यावे, दिवसभर विद्यार्थ्यांना नि:शुल्क ज्यूस फ्रूट जेवण चहा बिस्किट नाश्ता पाणी या सर्व व्यवस्था निशुल्क आंबेडकरवादी मिशन च्या वतीने करण्यात येणार आहेत.
प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासात्मक अभिवादन हेच खरे अभिवादन होईल या प्रत्यक्ष कृतीच्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यानी केलें आहे.
No comments:
Post a Comment