मुंबई : विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे.
समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवर व त्यांचे क्षेत्रनिष्ठ योगदान:
जावेद अख्तर – नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
साहित्य आणि भाषाशास्त्रात त्यांनी दिलेले ५० वर्षांचे अमूल्य योगदान…
संदिप तामगाडगे, IPS, DIG Nagaland State Police – नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
पोलीस सेवेतील प्रामाणिकता आणि सिकल सेल सारख्या आजाराशी लढा देण्यासाठी उभारलेले मूलभूत काम
राजू परुळेकर – समष्टी ऊलगुलान पुरस्कार
मराठी सार्वजनिक विचारविश्वात स्वतंत्र, निर्भीड आणि बिनधास्त मतप्रदर्शनाची परंपरा जोपासणारे
डॉ. श्यामल गरूड – समष्टी गोलपीठा पुरस्कार
‘कनातीच्या मागे’ या ग्रंथासाठी तसेच मराठी भाषा आणि आंबेडकरी साहित्यातील योगदानासाठी…
डॉ. अमोल देवळेकर – समष्टी निर्मिक पुरस्कार
आरोग्यसेवेत केलेले अमूल्य काम
एड. दिशा वाडेकर – समष्टी मूकनायक पुरस्कार
दोनशे वर्ष जुना जातीय कायदा मोडून काढत ऐतिहासिक लढ्याचं नवं पर्व रचणाऱ्या मूकनायक...
११ आणि १२ एप्रिल २०२५ | अण्णाभाऊ साठे सभागृह, मुंबई | संपूर्ण दिवस ‘समष्टी’मय
दोन दिवस, दोन दिशा — पण एकच ध्येय: समाज-परिवर्तनाची सर्जनशील यात्रा.
११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत ‘सारं काही समष्ठीसाठी’ सोहळा रंगणार आहे. यंदा या सोहळ्याचं आठवं वर्ष.
या दोन दिवसांत कला, साहित्य, सिनेमा, सामाजिक चर्चा आणि जाणीवांचा आवाज असं सर्वकाही एकत्र येणार आहे.
कार्यक्रमाचे ठळक आकर्षण:
१. अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण
२. रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम
३. वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद
४. सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, एड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद
५. ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार
६. आणि विशेष सादरीकरण: सत्यशोधक जलसा
७. चित्र आणि शिल्प प्रदर्शन : मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण
समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे — तो एक वैचारिक सोहळा आहे.
समष्टी फाउंडेशनने गेली आठ वर्षं सतत प्रयत्न केले आहेत की समाजातल्या वास्तव प्रश्नांना भाषा, गीत संगीत आणि कलाकृतींचा वापर करून अभिव्यक्त करण्याची संधी तळागाळातील प्रत्येकाला उपलब्ध व्हावी. ही परंपरा जपताना समष्टी पुरस्कार म्हणजे संवेदनशीलतेच्या आणि जबाबदारीच्या गाठी बांधणाऱ्या लोकांचा सन्मान आहे. सर्व विचारप्रवण नागरिकांना आणि माध्यम प्रतिनिधींना या पर्वसोहळ्याला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण दलित पँथरचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी सर्वांना केले आहे.
संपर्क:
समष्टी फाउंडेशन व नामदेव ढसाळ फाऊंडेशन
samashtifestival@gmail.com
प्री-हायलाईट्स' सेक्शन –
समष्टी पुरस्कार २०२५: एका नजरेत
८वे वर्ष
७ मान्यवरांचा सन्मान
२ दिवसांचा वैचारिक कला व साहित्य महोत्सव
चर्चा, नाट्य, संगीत, सिनेमा, चित्रं, शिल्प प्रदर्शन
स्थळ: अण्णाभाऊ साठे सभागृह, मुंबई
वेळ: ११-१२ एप्रिल, १२ दुपारी ते १० रात्री
No comments:
Post a Comment