नांदेड दि. 5 :- केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियाना’च्या (PM DA-JGUA) अंमलबजावणीसाठी किनवट तालुक्यातील मांडवा व घोगरवाडी येथे 5 जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात लाभार्थ्यांना आधारकार्ड, आरोग्य तपासणी, आयुष्यमन कार्ड वाटप, कृषी विभागामार्फत महाबीज बियाण्याचे वाटप किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला व तहसीलदार डॉ. शारदा चौडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक आदींची उपस्थिती होती. सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला व तहसीलदार डॉ. चौडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात त्यांनी लाभार्थ्यांना योजनेबाबत मार्गदर्शन केले. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असुन किनवट तालुक्यातील 128 व माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment