किनवट : भारत जोडो युवा अकादमी व राष्ट्र सेवा दल, शाखा किनवट द्वारा आयोजित विज्ञान, साहस व छंद शिबीरचा समारोप समारंभ उद्या (दि.८) सायंकाळी ५ वाजता साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, MIDC कोठारी(ता.किनवट) आयोजित करण्यात आला आहे.
अध्यक्षस्थानी मुरलीधर बेलखोडे, वर्धा (जेष्ठ पर्यावरणतज्ञ, वृक्षमित्र, इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) हे राहतील,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रामप्रसाद तौर, के. मुर्ती,पत्रकार व माजी नगराध्यक्ष, अखिल खान, प्रसिद्ध योगगुरु व सदाशिवराव मकदुम जेष्ठ प्रशिक्षक, राष्ट्र सेवा दल हे उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला अवश्य यावे व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, अशी विनंती भारत जोडो युवा अकादमी व साने गुरूजी रूग्णालय परिवाराने केली आहे.
No comments:
Post a Comment