महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या भोकर विभागीय अध्यक्षपदी डी.एस.पवार,तर सचिवपदी राम भोंगाळे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 4 August 2025

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या भोकर विभागीय अध्यक्षपदी डी.एस.पवार,तर सचिवपदी राम भोंगाळे यांची निवड


किनवट  : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या भोकर विभागीय अध्यक्षपदी डी.एस.पवार यांची,तर सचिवपदी राम भोंगाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.संघटनेची २०२५-२६ या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी संघटनेचे नांदेड परिमंडळाचे नेते शंकर घुले, सिद्धार्थ पिंपरे, परिमंडळ सहसचिव मंडळ, विनोद बिंगेवार, जोंधळे, नामदेव केंद्रे ,अध्यक्ष आर डी पवार, मंडळ सचिव सदानंद कांबळे यांच्या  प्रमुख उपस्थितीत आज(दि.३) दुपारी  साडेबाराच्या सुमारास के.के.गार्डन,गोकुंदा(ता.किनवट) येथे संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली.या बैठकीत ही निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी अशी;

        उपाध्यक्ष - प्रशांत भोयर, विजय शिंदे, संदीप हूलगुंडे,अभिजित गुंडेराव, माधव मेटकर व सिद्धेश्वर मेंडके,सहसचिव - बालाजी शिंदे व नारायण कावळे,विभागीय संघटक - संतोष फोले,कोषाध्यक्ष - अतुल तीव्हाळे, प्रसिद्धी प्रमुख - आकाश वाघमारे, उमरी व दिलीप जाधव,प्रमुख सल्लागार - पी के खंदारे व रामेश्वर डोखळे कार्यकारणी सदस्य - माधव देशमुखे, नामदेव चारलेवाड, वनराज पवार, एस.एन. वाळके ,आकाश साळवे, गणेश ताटीकुंडवार व नागेश पटपेवाड महिला प्रतिनिधी - प्रतिभा प्रमोद स्थूल व रुखसानाबेगम अ. करीम व शोभाताई मोतीराम कन्नाके.


No comments:

Post a Comment

Pages