किनवट,दि.१२ : जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य वितरणास ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन आज(ता.१२) तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की,तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप करण्याचे शासनाने आदेश दिले होते. परतु, शासकिय धान्य गोदामातून दुकानदारांना माल उशीरा प्राप्त झाल्यामुळे माहे जून, जुलै चे वाटप काही दुकानदारांनी अद्याप केलेले नाही. त्यामुळे तसेच माहे ऑगस्ट चा माल काही दुकानदारांना अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे माहे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.
निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोंडीराम कराड, उपाध्यक्ष म. जावेद म. चव्हाण,दत्तात्रय गड्डमवार, प्रदमा व्यंकन्ना आयलेनिवार,सदस्य
रामलु नानाजी तिरनगवार, अर्चना गुट्टे , मिलिंद सर्पे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment