कमिशनमध्ये आठ वर्षांनंतर फक्त २० रुपयांची वाढ: रेशन दुकानदारांना हवे क्विटलमागे तीनशे रुपये वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 14 August 2025

कमिशनमध्ये आठ वर्षांनंतर फक्त २० रुपयांची वाढ: रेशन दुकानदारांना हवे क्विटलमागे तीनशे रुपये वाढ

किनवट ,ता.१४  : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमार्फत अधान्याचे वितरण केले जाते. या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना प्रति क्विटल १५० रुपये कमिशन दिले जात होते. यात राज्य सरकाने मंगळवारी(ता.१२) रुपयांची वाढ करून ते १०० रुपये इतके केले. मात्र, महागाई इष्टाकांचा विचार करून शासनाने हे कमिशने ३०० रुपये प्रति क्विटल इतके करावे, अशी मागणी  महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळ,नाशिक तालुका शाखा किनवट च्या वतीने करण्यात आली आहे.

    तालुक्यात २०१ रास्त भाव दुकाने आहेत. या दुकानांमधून दर महिन्याला शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, साखर आदी धान्याचे वितरण केले जाते. या कामासाठी रास्त दुकानदारांना कमिशन मिळते. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून या कमिशनमध्ये वाढ झाली नव्हती. प्रति क्विटल १५० रुपये इतकेंच कमिशन दिले जात होते. त्यामुळे हे कमिशन वाढविण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदार संघटनांकडून सातत्याने आंदोलने सुरू होती.त्याची दखल घेत राज्य सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या कमिशनमध्ये २० रुपयांची वाढ करून ते १७० रुपये प्रति क्विटल करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळ ,नाशिक या संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु त्यासोबतच ही दरवाढ खूपच कमी आहे, महागाई इष्टाकांचा विचार करता सद्यस्थितीत प्रति क्विटल ३०० रुपये इतके कमिशन मिळायला हवे अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागणीसाठी येत्या काळात आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

|| यासाठी हवी कमिशनवाढ||

   रास्त भाव दुकानदारांचे कमिशन वाढणे का गरजेचे आहे याची महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळाने अनेक कारणे दिली आहेत. यामध्ये जागेचे भाडे, तोलाई करणाऱ्या कामगाराची मजुरी यांचा खर्च मोठा आहे. रेशन दुकानांना आता व्यावसायिक दराने वीज आकारणी होत आहे. हा सर्व खूप अधिक असल्याने प्रति क्विटलला तीनशे रुपये इतके कमिशन मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

   रास्त भाव दुकानदारांच्या कमिशनमध्ये शासनाने २० रुपयांची वाढ केली त्याचे आम्ही स्वागत करतो. ही परंतु ही वाढ तोकडी आहे. महागाईचा विचार करता तीनशे रुपये इतके कमिशन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या काळात आमचे आंदोलन सुरूच राहील. - देवानंद सरोदे, अध्यक्ष,रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळ,नाशिक, जिल्हा शाखा, नांदेड.


No comments:

Post a Comment

Pages