मुंबई :-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे.पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
२१ तारखेपर्यंत राज्यातील १५ ते १६ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबईतील पाऊस आणि त्याचसोबत महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची देखील माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पावसाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ' २१ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शख्यता आहे. १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलिका, जगबुडी नदीनी इशारा पातळी ओलांडली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहोत.'
No comments:
Post a Comment