भीमशक्ती मराठवाडा विभागीय बैठक यशस्वी संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 28 September 2025

भीमशक्ती मराठवाडा विभागीय बैठक यशस्वी संपन्न

 भीमशक्ती मराठवाडा विभागीय बैठक यशस्वी संपन्न



छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नंदनवन हॉटेल जवळ, कॅम्ब्रिज चौक, चिकलठाणा येथे आज भीमशक्ती मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष मा.खा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आयु. दिनकर ओंकार, मुंबई प्रदेशाध्यक्ष आयु. शशिकांत बनसोडे, प्रदेश सरचिटणीस आयु. मोहन माने, प्रदेश सचिव आयु. विजय सुखदेव, आयु. सचिन सिरसाट, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष आयु. संतोष भिंगारे, आयु. आनंद तायडे, युवा आघाडी अध्यक्ष आयु. प्रेम चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजु मंजुळे, विनोद कोरके यांच्यासह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बैठकीत संघटनवाढ, आगामी कार्यक्रम, कार्यपद्धती आणि जनसंपर्क मोहीम यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी आदरणीय हंडोरे साहेबांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करत सामाजिक परिवर्तनासाठी संघटितपणे लढण्याचे आवाहन केले.



No comments:

Post a Comment

Pages