लोकनेते जोतिबा खराटे यांच्या वाढदिवसा निमित्य 111 रक्तदात्यांचे रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 8 September 2025

लोकनेते जोतिबा खराटे यांच्या वाढदिवसा निमित्य 111 रक्तदात्यांचे रक्तदान


माहूर :

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) जिल्हाप्रमुख तथा लोकनेते जोतिबा खराटे यांचा वाढदिवस दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी अंजनखेड गावी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त महारक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.     या रक्तदान शिबिरात एकूण 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्वप्रथम परम पूज्य साईनाथ महाराज वसमतकर व ह.भ.प. शिव महाराज कळमनुरीकर यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे शुभारंभ करून प्रवचन पर शुभेच्छा देण्यात आले. यावेळी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे डॉक्टर खडसे व त्यांच्या टीमने रक्तदान करून घेतले. ज्योतिबा दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त २४ वर्षापासून अखंडितपणे महारक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात येते. सर्व प्रथम ज्योतिबादादा खराटे यांच्या  सत्कार किनवट/माहूर     विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल,उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव,किनवट तालुका प्रमुख मारुती पाटील,माहूरचे तालुकाप्रमुख जितू चोले,शिवसेना शहरप्रमुख प्रशांत कोरडे ,युवासेना तालुकाप्रमुख अतुल दर्शनवार, यांच्या हस्ते करण्यात आले.            




   यावेळी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख लोकनेते ज्योतिबा दादा खराटे यांच्यावर प्रेमकरणाऱ्या हजारो शिवसैनिकान सह  विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्याचे सायंकाळपर्यंत शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, यवतमाळचे जिल्हाप्रमुख प्रवीण भाऊ शिंदे, उपजिल्हाप्रमुख भरवाडे,खासदार नागेश पाटील यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर, रवींद्र भारती, भीमराव भालेराव, डॉ. पुंडलिक आमले, स्वागत आयनेनीवार, शिवा आंधळे,कांतराव घोडेकर, डॉ. निरंजन केशवे,मेघराज जाधव, किशनराव राठोड,माजी सभापती विश्वनाथ कदम,विनोद राठोड, शहर संघटक किशोर बोलेनवार, प्रमोद केंद्रे किनवटचे जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, के.मूर्ती,फुलाजी गरड,प्रमोद पहुरकर, किरण ठाकरे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,केशव कऱ्हाळे यांच्यासह किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages