अकोट नगरपालिकेत भाजपनं केली एमआयएमशी युती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 7 January 2026

अकोट नगरपालिकेत भाजपनं केली एमआयएमशी युती

अकोट नगरपालिकेत भाजपनं केली एमआयएमशी  युती 





अकोला  :- जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने 'एमआयएम'सोबत युती केली आहे. नगरपालिकेत बहूमत नसलेल्या भाजपने ५  नगरसेवक असलेल्या 'एमआयएम'ला सोबत घेतले. त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाही या ठिकाणी सत्तेत राहणार आहे. भाजपने स्थापन केलेल्या 'अकोट विकास मंचा'त एमआयएम दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी' असणार आहे. काँग्रेस आणि वंचित हा पक्ष या ठिकाणी विरोधात राहणार आहे.

      'पार्टी विथ डिफरंस' अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का?, असा प्रश्न अकोल्यात उपस्थित होतोय. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क भाजपने 'एमआयएम'सोबत आघाडी केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, ३५  सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये ३६ पैकी ३३  जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला ११  जागा मिळाल्यात.

No comments:

Post a Comment

Pages