आत्मविश्वास, शिस्त व ध्येयवादाची जडणघडण : आंबेडकरवादी मिशनमध्ये सूरज गुरव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नांदेड : आंबेडकरवादी मिशन येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात सूरज गुरव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, धुप्पा येथील विद्यार्थ्यांच्या भेटीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांनी शिस्त, आत्मविश्वास, कष्ट व ध्येयवादी दृष्टिकोन यांचे महत्त्व विशद केले.
आपल्या मार्गदर्शनात गुरव यांनी सांगितले की, “विद्यार्थीदशेत योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मूल्याधिष्ठित विचारसरणी अंगीकारली तर कोणतेही ध्येय गाठता येते.” स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, वेळेचे नियोजन, नकारात्मकतेवर मात करण्याची मानसिकता आणि समाजहिताची जाणीव या मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उद्योजक मारोती कंठेवाड, डॉ. विनोद काळे, डॉ. भास्कर दवणे, डॉ. यशवंत चव्हाण, प्राचार्य संजय पाटील, प्राचार्य सरोज संजय पाटील, इंजी. राजे पाटील, रेणुका तम्मलवर, सहा आयुक्त, जी. सिद्धार्थ व वेंकट हनुमंत वेंकटगिरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या भेटीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा, दिशा व आत्मविश्वास लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


No comments:
Post a Comment