राज्यात सत्ताधारी भाजपा सरकारच्या काळात, निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, उमेदवारही विकले
ठाकरे शिवसेनेचा राज्यसरकारवर गंभीर आरोप
मुंबई :
राज्यात सत्ताधारी भाजपा सरकारच्या काळात, निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, उमेदवारही विकले गेले आहेत, असा ठाकरे शिवसेनेने सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यात पुन्हा निवडणुका होणार आहेत. तर राज्यात बिनविरोध विजयाची डबडी, नाचकाम करत आहेत. राज्यात कशाला घेता निवडणुका? राज्यातील सत्ताधारी सरकारचा माज वाढला आहे. भाजप हा पक्ष दुतोंडी गांडूळ आहे, राज्यातील राजकीय स्थितीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा आरोप करण्यात आला आहे.
राज्यात सर्व निवडणुका बिनविरोध का होऊ शकत नाहीत. आणि आता ,तर पुन्हा निवडणुका होणार? राज्यात निवडणुकाच नका घेऊ, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुका खरंच आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असा प्रश्न विरोधी पक्ष आणि मतदारांनाही पडत आहे. राज्यात महायुतीची बिनविरोध विजयी महापालिका निवडणुकांवर प्रश्न निर्माण केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याच्या राजकारणातील सध्याच्या स्थितीवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. राज्यातील भाजप आणि शिंदे गटामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी, एक स्पर्धा सुरू असून दोन-पाच कोटींचें आमिष उमेदवारांना दाखवत आहेत. राज्यात सध्या बिनविरोध विजयाची डबडी वाजवून, नाचकाम करण्याचा प्रकार राज्यातील, सत्ताधारी भाजपा सरकारकडून सुरू आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेने केली आहे.
राज्यात एकिकडे नितीमत्ता, चारित्र्यावर भाषण करायचे आणि दुसरीकडे घोटाळेबाजांना सत्ताधारी पक्षात घेत निवडणुका जिंकायच्या याच भूमिकेमुळे राज्यातील भाजपा सरकारला दुतोंडी गांडूळ म्हणावे वाटत आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ताधाऱी भाजपा सरकारची मनमानी व राज्यातील सरकारी यंत्रणांचा माज वाढला आहे, हे राज्य असे कधीच नव्हते ,असे आहे. राज्यात निवडणुका लढायच्या आधीच , विजय विकत घेणार असाल तर, निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे, निवडणुका घेऊच नका, अशी ठाकरे शिवसेनेने भाजपा सरकारवर टीका केली आहे.
काही ठिकाणी समोरच्या उमेदवाराच्या तांत्रिक चुकांमुळे, निवडणूक बिनविरोध होऊ शकते, पण सगळीकडे सत्ताधाऱी भाजपा सरकार बिनविरोध निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, तो प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. राज्यात प्रत्यक्षात अशा स्थितीत कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही, अशी वस्तुस्थिती राज्यात आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक मतपत्रिकेवर किंवा ईव्हीएमवर नोटाचे बटण आहे. या उमेदवारांपैकी कोणीच नाही. राज्यातील हजारो मतदार निषेध म्हणून ‘नोटा’चे बटण दाबतात. जर ‘नोटा’ पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या अधिक असेल तर, ती निवडणूक रद्द होते व राज्यात निवडणूक पुन्हा घेण्यात येते. त्यामुळे कायद्याचे पालन झाले तर, निवडणूक आयोग बिनविरोध विजय फेटाळून लावेल. राज्यात सत्ताधारी भाजपा सरकारचे जे 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत, त्यांना निवडणुकीत ‘नोटा’शी सामना करावा लागेल. त्यामुळे राज्यात पुन्हा निवडणूक घ्यावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
राज्यात भाजपा सरकारच्या काळात सध्या राज्यातील निवडणूक आयोगच नव्हे, तर राज्यातील पोलीस प्रशासन, राज्यातील महापालिका निवडणूक उमेदवार ही विकले गेले आहेत, मात्र काही महापालिकांच्या ठिकाणी मतदारांच्या भूमिकाही संशयास्पद असून, पैशांकडे बघुन मतदारदेखील फसले आहेत, अशी ठाकरे शिवसेनेने राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारवर टीका केली आहे. राज्यातील मुंबई व इतर ठिकाणी ’70 उमेदवारी जागांवर एकही मत पडले नाही आणि तरीही तेथे राज्यातील सत्ताधाऱी भाजपा सरकारने निवडणुका कशा काय जिंकल्या आहेत? हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप व त्यांच्या सत्तेतील मित्रपक्षांनी लोकशाहीचे हत्या केली आहे, लोकशाहीचे माफियाकरण केले आहे. राज्यात ज्या निवडणुकांत जेथे मते चोरता आली नाहीत, तेथे दहशत व पैशांनी विरोधी उमेदवारांना सत्ताधारी भाजपा सरकारने माघार घेण्यास भाग पाडले आहे, तर राज्यातील लोकशाहीचे हे सध्याचे चित्र दिसत आहे, असे राज्यातील ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.

No comments:
Post a Comment