कॉ. सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखतींवर नांदेडमध्ये वैचारिक परिसंवाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 5 January 2026

कॉ. सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखतींवर नांदेडमध्ये वैचारिक परिसंवाद

कॉ. सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखतींवर नांदेडमध्ये वैचारिक परिसंवाद




नांदेड‌ : कल्चरल असोसिएशन, नांदेडच्या वतीने ज्येष्ठ लेखक-कार्यकर्ते कॉ. सुभाष थोरात यांच्या “विचारवंतांच्या मुलाखती” (संपादन: डॉ. श्रीधर पवार, राजीव देशपांडे) या वैचारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पुस्तकावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज परिसरातील मल्टी मीडिया हॉल येथे संपन्न होणार आहे.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नंदन नांगरे (निवृत्त शिक्षण संचालक) असणार आहेत. सहभागी वक्ते म्हणून कॉ. डॉ. महेबूब सय्यद (अहिल्यानगर) आणि आयु. डॉ. प्रकाश मोगले (नांदेड) आपले विचार मांडणार आहेत.
     कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ विचारवंत व नाटककार प्रा. दत्ता भगत तसेच कॉ. किरण मोघे (पुणे) लाभणार आहेत. समकालीन वैचारिक प्रवाह, सामाजिक चळवळी आणि विचारवंतांच्या संवादातून निर्माण होणाऱ्या दिशादर्शक मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कल्चर  असोसिएशनचे डॉ. राजेंद्र गोणारकर (अध्यक्ष) व डॉ. विजयकुमार माहुरे (सचिव) यांनी केले असून, नांदेड व परिसरातील अभ्यासक, विद्यार्थी व विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages