संभाजी ब्रिगेडमध्ये युवकांचा ओघ वाढतोय; किनवट–माहूर विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 5 January 2026

संभाजी ब्रिगेडमध्ये युवकांचा ओघ वाढतोय; किनवट–माहूर विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या

 संभाजी ब्रिगेडमध्ये युवकांचा ओघ वाढतोय; किनवट–माहूर विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या



किनवट : शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारणाचा वसा घेत महामानवांच्या विचारधारेवर वाटचाल करणाऱ्या संभाजी ब्रिगेडकडे युवक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या या संघटनेने संघर्षाऐवजी वैचारिक प्रबोधनावर भर देत हातात लाठीकाठीऐवजी पुस्तक देण्याचे काम केले आहे. यामुळेच संभाजी ब्रिगेडमध्ये नवविचारी युवकांची मजबूत फळी उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


नांदेड येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या किनवट–माहूर विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड, विधानसभा संघटकपदी विक्रम पवार, तर प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची बहुमताने निवड करण्यात आली.


या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष कमलेश पाटील कदम व जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.


यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष कमलेश पाटील कदम, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे, जिल्हा सचिव बालाजी पाटील सिरसाट, किनवट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम, शहराध्यक्ष सुमित पाटील माने, हदगाव तालुकाध्यक्ष किरण पाटील वानखेडे, अंकुश कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages