आज आंबेडकरवादी मिशनमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास भेट; गुणवंतांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 5 January 2026

आज आंबेडकरवादी मिशनमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास भेट; गुणवंतांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ

 आज आंबेडकरवादी मिशनमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास भेट; गुणवंतांचा प्रेरणादायी सत्कार समारंभ


नांदेड  : आंबेडकरवादी मिशन व ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ धुप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार (दि. ६ जानेवारी २०२६) रोजी शाळकरी विद्यार्थ्यांची अभ्यास भेट व गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सिडको, नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनच्या सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमात सुरज गुरव (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नांदेड) यांचा महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथसूचीत समाविष्ट झालेल्या ‘विद्यार्थी धर्म’ या स्पर्धा परीक्षा ग्रंथाच्या लेखनाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. तसेच बालाजी कंटेवाड व मारोती कंटेवाड यांचा गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सोलार शेती पंप इन्स्टॉलेशन कार्यासाठी गौरव होणार आहे.

    याचप्रमाणे डॉ. विनोद काळे (रसायनशास्त्र) यांना पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार असून, व्यंकटी हनुमंत वंटगिरे यांची वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) पदावर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. भास्कर दवणे, संजय पाटील (शेळगांवकर), इंजि. राजे पाटील, स्वप्नाली धुतराज काळे, गणेश सवंदकर, खंडू दर्शने यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन, विज्ञाननिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळणार असून, अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages