गोकुंदा येथे ‘भव्य मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन आरोग्य व तंदुरुस्तीचा जागर – ‘रन फॉर फिटनेस, रन फॉर हेल्थ’ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 6 January 2026

गोकुंदा येथे ‘भव्य मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन आरोग्य व तंदुरुस्तीचा जागर – ‘रन फॉर फिटनेस, रन फॉर हेल्थ’

 गोकुंदा येथे ‘भव्य मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन

आरोग्य व तंदुरुस्तीचा जागर – ‘रन फॉर फिटनेस, रन फॉर हेल्थ’



गोकुंदा : 

धावत्या जीवनशैलीत हरवलेले आरोग्य पुन्हा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने अनुस नुट्रेशन झोन यांच्या वतीने किनवट शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रन फॉर फिटनेस, रन फॉर हेल्थ’ या प्रेरणादायी संकल्पनेतून ही स्पर्धा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

ही मॅरेथॉन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे २ किलोमीटर अंतराची असून, २५ ते ५५ वयोगटातील नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ₹३०००, द्वितीय बक्षीस ₹२००० व तृतीय बक्षीस ₹१००० रोख स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भीमरावजी केराम साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, पोलीस निरीक्षक मा. गणेश कराड साहेब व शिवसेना तालुका प्रमुख मा. बालाजी पाटील मुरकुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॅरेथॉनची सुरुवात दराडे कॉम्प्लेक्स, आय.टी.आय. कॉलेजजवळ, गोंकुदा–किनवट येथून होणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन आरोग्य सल्लागार अनुराधा मडेलवार यांनी केले आहे. सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क फक्त ₹१०० ठेवण्यात आले आहे.

नोंदणीसाठी गजानन सुपर मार्केट गोकुंदा येथे गजानन संतोष महाजन यांच्याशी ९५७३५२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आरोग्यपूर्ण समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages