ठाण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक; समितीतील पदाधिकाऱ्यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 17 March 2026

ठाण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक; समितीतील पदाधिकाऱ्यांची निवड

 ठाण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक; समितीतील पदाधिकाऱ्यांची निवड



ठाणे  : येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन तसेच विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीमध्ये जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे, कार्याध्यक्षपदी बुद्धभूषण गोटे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भास्कर वाघमारे, भास्कर आरकडे व पंढरीनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी राजाभाऊ चव्हाण व डि. अ. सावंत यांची निवड करण्यात आली असून खजिनदारपदी महेंद्र अंभोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बैठकीत उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.



No comments:

Post a Comment

Pages