UPSC-2025 मध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा आंबेडकरवादी मिशनतर्फे सत्कार
नांदेड : आंबेडकरवादी मिशन, सिडको नवीन नांदेड यांच्या वतीने UPSC-2025 मध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरवादी मिशन, सिडको नवीन नांदेड येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले (IAS), पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (IPS) आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली (IAS) उपस्थित राहणार आहेत.
यावेळी UPSC मध्ये यश संपादन केलेल्या अतुल राजूरकर (IPS 2024), क्षितिजेश पालिमकर (IAS AIR-283) आणि डॉ. प्रीतम भाले (IPS AIR-742) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या यशामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यामध्ये कामाजी पवार, डॉ. गोविंद नांदेडे, उत्तम सोनकांबळे, व्यंकटराव किडे पाटील, डॉ. यशवंत चव्हाण, माळले आर.बी., संजय पाटील, इंजि. राजे पाटील, प्राचार्य सुरेश घुले, मौलाना आसिफ, मिलिंद बनसोडे आदींचा समावेश आहे.
या सत्कार सोहळ्याचे आयोजन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमास विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:
Post a Comment