श्रेयस ॲकॅडमी गोकुंदा (किनवट) येथे मोफत कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी :
किनवट : तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द युनिक ॲकॅडमी, पुणे आणि श्रेयस ॲकॅडमी, गोकुंदा (किनवट) यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुंदा (किनवट) येथे महाराष्ट्रातील प्रसिध्द चालू घडामोडी या पुस्तकाचे संपादक प्रा. देवा जाधवर यांचे चालू घडामोडी या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन दि. 11 मार्च 2026, बुधवार, सकाळी 10.00 वाजता श्रेयस ॲकॅडमी, दत्तनगर रोड, एकवीरा मंदिर समोर, गोकुंदा (किनवट) येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. गणेश कराड, प्रा. डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. भिमराव घुले यांची उपस्थिती होती.
मा. गणेश कराड सरांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाची रणनीती कशी असावी याविषयी मागर्दशन केले. तर चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक प्रा. देवा जाधवर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चालू घडामोडी या विषयाची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमस्थळी देवा जाधव संपादित चालू घडामोडी इयर बुक आणि सराव प्रश्नसंच 50% सवलतीत उपलब्ध करण्यात आली होती. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दत्ता कसबे, सोमा पाटील, मधुकर पाटील, प्रल्हाद अभंगे, राहुल पाटील, राजकुमार पाटील यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोल्हे सर, प्रा. मुंडे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रेयस ॲकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी केले.


No comments:
Post a Comment