श्रेयस ॲकॅडमी गोकुंदा येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 9 March 2026

श्रेयस ॲकॅडमी गोकुंदा येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन

 श्रेयस ॲकॅडमी गोकुंदा  येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन 


प्रतिनिधी : 

 किनवट : तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनिक ॲकॅडमी, पुणे आणि श्रेयस ॲकॅडमी, गोकुंदा (किनवट) यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुंदा (किनवट) येथे महाराष्ट्रातील प्रसिध्द चालू घडामोडी या पुस्तकाचे संपादक प्रा. देवा जाधवर यांचे चालू घडामोडी या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन दि. 11 मार्च 2026, बुधवार, सकाळी 10.00 वाजता श्रेयस ॲकॅडमी, दत्तनगर रोड, एकवीरा मंदिर समोर, गोकुंदा (किनवट) येथे करण्यात आले आहे. सदरील कार्यशाळा ही मोफत स्वरुपात असून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

तसेच कार्यक्रमस्थळी देवा जाधव संपादित चालू घडामोडी इयर बुक आणि सराव प्रश्नसंच 50% सवलतीत उपलब्ध असणार आहे. शहरातील व तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा आवश्य लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment

Pages