मंत्रालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 18 April 2026

मंत्रालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष

मंत्रालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष 



मुंबई : 

अनुसूचित जाती जमाती वि. जा/ भजा/ई.मा.व/वि.मा.प्र/ शासकीय- निमशासकीय/ अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या विद्यमाने छ. शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त महारापुरषाच्या संयुक्त जयंती महोत्सव दि.16 एप्रिल, 2026 रोजी मंत्रालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास सा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय श्री. संजय शिरसाट साहेब उपस्थित होते तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे साहेब आणि डॉ.  राजेश गवांदे साहेब सचिव, राजशिष्टाचार, सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



 मा.ना. संजय शिरसाट साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज जो मी काय आहे तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे असे प्रतिपादन केले. तर डॉ. हर्षदीप कांबळे साहेब यांनी उपस्थित असणा-या सर्वानी  संविधानाचे वाचन करून झाल्यानंतर माझ्या समवेत चर्चा करावी असे उपस्थित जनसमुदायास आवाहन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र निर्मितीत महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले.  या संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. भारत वानखेडे यांनी सदर संघटना मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाकडे विधायक मार्गाने पाठपुरावा सतत करत राहील याबाबत उपस्थित जनतेला आश्वासित केले. 


कार्यक्रमात जग बदलणारा बापमाणूस या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ व्याख्याते माननीय श्री जगदीश ओहोळ यांनी जग बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातच असून ते सर्वांचे ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत आहेत असे प्रतिपादन केले. उपस्थित जनसमुदाय  त्यांचे व्याख्यान ऐकण्यात मंत्रमुग्ध झाला होता.

या कार्यक्रमात संघटनेमार्फत येत्या कालावधीत 1,00,135 भारतीय संविधानाच्या प्रति राज्यात सर्वत्र वितरित करण्याचे अभियान राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात आज रोजी प्रतीकात्मक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाच नागरिकांना संविधानाच्या प्रतीचे वाटप करून संविधान वाटप अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना 135 संविधानाच्या प्रतीचे मोफत वाटप केले. या अभियानाची माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब व डॉ. हर्षदीप कांबळे साहेब यांनी सुद्धा प्रशंसा केली. संघटनेचा हा उपक्रम आजच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आकर्षण ठरला.


 या कार्यक्रमास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालय परिसरतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


 सदर जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी  संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. भारत वानखेडे, कार्याध्यक्ष श्री अंबादास चंदनशिवे,जयंती उत्सव समितीचे स्वागताअध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत ढोके, सुभाष गवई, कार्याध्यक्ष, सुबोध भारत,मुंबई प्रदेशाध्यक्ष, भास्कर बनसोडे, उपाध्यक्ष सी. आर.निखारे,कोषाध्यक्ष, श्रीमती सविता शिंदे, महिला अध्यक्षा, संघटन सचिव श्री. राज श्रॉफ, संघटन सचिव श्री.पंकज सावदेकर, शुद्धोधन, मंगल नाखवा महिला सचिव,शुध्दोधन वाकोडे, संघटक, श्री. श्रीराज  पळसपगार, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुसिंग राठोड,अशोक शेजुळे, मुंबई कार्याध्यक्ष, विनायक कांबळे, किशोर इंगळे प्रमोद गजभारे वीरेंद्र वाघमारे  प्रभू सावंत ,  राजेंद्र धावारे, विजयकुमार चप्पलवार, प्रज्ञा मेश्राम नीलिमा कांबळे, ज्ञानेश्वर पाटमासे, अमोल मोहिते, बापू खरात प्रवीण पवार   व अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 कार्यक्रमाचे सुरेख व नेटके सूत्रसंचालन श्रीमती दिपाली शहारे  महिला उपाध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.प्रज्ञा मनोहर उपसंचालक पर्यटन  कोकण प्रदेश  यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages