आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- आ. राजकुमार बडोले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 25 April 2026

आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- आ. राजकुमार बडोले

 आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे  षडयंत्र- आ. राजकुमार बडोले



गोंदिया: 

गोंदियात  शहरात उपवर्गीकरण विरोधात गर्जना , बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी -  तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्नाच्या विरोधात डाव हाणून पाडण्यासाठी आणि भावा-भावात भांडण लावण्याच्या निषेध करण्यासाठी आज भव्य आंदोलन गोंदिया येथे करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत  विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.  आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages