मांडवीच्या ज्ञानदाला मुंबईत डाक सेवा पदोन्नती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 26 April 2026

मांडवीच्या ज्ञानदाला मुंबईत डाक सेवा पदोन्नती

 मांडवीच्या ज्ञानदाला मुंबईत डाक सेवा पदोन्नती 



किनवट, ता. २६ : सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा आणि मेहनतीची तयारी ठेवल्यास यश नक्कीच आपल्या भोवती येते, असे मत ज्ञानदा चतुरंग कांबळे यांनी व्यक्त केले.खात्याअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ज्ञानदा चतुरंग कांबळे यांची मुंबई येथे "बहुकार्य सेवा कर्मचारी" (एम.टी.एस.) म्हणून पदोन्नती झाली असून मांडवी उप डाकपाल कार्यालयाकडून त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी  त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उप डाकपाल सुरेश वाघमारे हे होते.

    या सोहळ्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पळशीच्या ज्येष्ठ शाखा डाकपाल तुळसा पुसनाके यांनी ज्ञानदाचा सत्कार केला. त्या म्हणाल्या, “ज्ञानदा मोठी अधिकारी होऊन आपल्या भागात सेवानिवृत्त होईल अशी अपेक्षा मी करीत आहे.”

कार्यक्रमात अध्यक्ष  सुरेश वाघमारे यांनीही कौतुक करत म्हटले, “अत्यल्प कालावधीत व कमी वयात ज्ञानदाने डाक सेवा उत्कृष्टपणे निभावली असून अभ्यासात खंड पडू दिला नाही. मुंबईत तिचा अनुभव वाढेल आणि ती नक्कीच अधिकारी पदावर येईल, याचा मला अभिमान वाटतो.”

   सत्कार सोहळ्यात दिनेश दासरवार, दरसावंगीचे सर्व शाखा डाकपाल, रवि दासरवार, कनकी धिरज लखन राठोड, खंबाळा नरसय्या पदकंठवार, कोठारी राहुल भुरे, लिंगी पोचन्ना अटलावार, नागापूर धर्मेंद्र ठाकूर, निराळा अनिता सेगेवाड, पळशी तुळसाबाई पुसनाके, पाटोदा गजानन पांडे, पिंपळगाव गोदाजी पोलासवार, रायपूर तांडा रमेश दासरवार, सक्रु नाईक तांडा रामराव पिटलावार, सिंगोडा गंगन ना वेडंटी, उमरी करण चव्हाण, उनकदेव संतोष नदीकोंडावार, निवृत्त डाक सेवक स्वामी दासरवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages