डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी नवीन उपक्रम आयोजन
नांदेड, प्रतिनिधी :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युथ पँथर नांदेड जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांच्या वतीने करण्यात आले असून समाजहिताच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दि.१४ एप्रिल २०२५ रोजी स्नेहनगर पोलीस कॉलनी येथे दुपारी १२.३० वाजल्यापासून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमात पुढील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान प्रस्ताविका वाटप,पत्रकार बांधवांचा सन्मान, पाणपोई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीच्या बॅचचे मोफत वाटप, चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान, , नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंते पय्यांबोधी महाथेरो हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर हे होते . चळवळीतील सर्व कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला हे नवनियुक्त अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तर बाबासाहेबांचा फोटो व सही असलेल्या बॅचेस चे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सामाजिक राजकीय मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदरील आयोजन भिमराव बुक्तरे यांच्या वतीने करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वीतेसाठी अमोल धमसे,सूर्यकांत पाटोळे, दिनेश घुले,सूर्यकांत नरवाडे, दिपक पोहरे, इजहार बेग, प्रबुद्ध काळे, प्रदीप घुगरे,अक्षय गायकवाड, इंद्रजीत पाटोळे,उत्तम ढोले, सुनील खिराडे, नागराज गजभारे आनंद पाटील आदी जण परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment