किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
किनवट : महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज(ता.१४) उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली.आमदार भीमराव केराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.याठीकाणी ॲड.दिलिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाणी बाॅटलचे वाटप केले.नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडूचे वाटप केले. गुरुस्वामी पवार यांनी शितपेयाचे वाटप केले, एका कार्यकर्त्याने थंड मठ्ठ्याचे वाटप केले.
बस स्नानकात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ,तर जेतवन बुद्ध विहारात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी युवा नेते करण एंड्रलवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार, नगरसेविका ललिता मुनेश्वर,प्रा.रामप्रसाद तौर,प्रा.दगडू भरकड, रिपाइं चे नेते दादाराव कयापाक,पीरिपाचे विनोद भरणे,मारोती मुनेश्वर, उपप्राचार्य प्रा डॉ.पंजाब शेरे, मिलिंद धावारे, विवेक ओंकार, शंकर नगराळे, आकाश आळणे,ॲड.आकांक्षा आळणे, निखिल कावळे,ॲड.सम्राट सर्पे,साजिद बडगुजर,प्रा.रविकांत सर्पे, महेंद्र नरवाडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आजी - माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह महीला, पुरुष ,बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे निखिल सर्पे, आकाश सर्पे,अनिकेत भरणे, सिद्धार्थ भरणे,ऑलफ्रेंड ठमके, संघर्ष घुले,अनिल कांबळे यांनी पुढाकार घेतला.

No comments:
Post a Comment