खासदार हेमंत पाटील यांचे राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश मुनेश्वर यांना अभिनंदन पत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 November 2019

खासदार हेमंत पाटील यांचे राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश मुनेश्वर यांना अभिनंदन पत्र


खासदार हेमंत पाटील यांचे राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त रमेश मुनेश्वर यांना अभिनंदन पत्र


किनवट(प्रतिनिधी): यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा 'राज्य शिक्षक पुरस्कार' आदिवासी विभागातून रमेश यादवराव मुनेश्वर यांना मिळाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी मुनेश्वर यांना 'अभिनंदन पत्र' पाठविले आहे. रमेश मुनेश्वर हे लोणी (ता.किनवट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक आहेत.
   खासदाराचे स्वीय सहाय्यक सुनिल गरड  यांनी ते पत्र रमेश मुनेश्वर यांना नुकतेच प्रदान केले आहे. याप्रसंगी मारोती सुंकलवाड ,पत्रकार शकिल बडगुजर, अॅड.मिलिंद सर्पे, निवृत पोलिस निरीक्षक श्री.पारधी, प्रा.डाॅ.सुनिल व्यवहारे व संतोष यलचलवार हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages