भोकरच्या जि.प. कन्या शाळेत मित्र उपक्रमास प्रारंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 29 November 2019

भोकरच्या जि.प. कन्या शाळेत मित्र उपक्रमास प्रारंभ


भोकरच्या जि.प. कन्या शाळेत मित्र उपक्रमास प्रारंभ

भोकर ( प्रतिनिधी )
        राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी इयत्ता ५वी ते १० वी पर्यंतच्या वर्गाकरीता मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना घेण्याचे निर्देशित केले. भोकरच्या जि.प.कें.प्रा.कन्या शाळा भोकर येथे संविधान दिनाचे औचित्य साधून भोकरचे गट शिक्षणाधिकारी मा.डॉ.डी.एस. मठपती व जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.एम.जी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सुरूवात झाली.
         यावेळी केंद्रप्रमुख जे.एम.शेख, मुख्याध्यापक सुधीर सुरंगलीकर, प.स. चे विशेष शिक्षक सुधांशू कांबळे आदी उपस्थित होते.
          आनापान साधना हा विपश्यना शिकण्याची पहिली पायरी आहे. बाल व किशोरवयीन मुलांमधील ताणतणाव,चिंता, काळजी,राग,भीती, चिड,उदासिनता, आदी कमी करण्यास व एकाग्रता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती वाढून बालक मानसिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी शाळा सुरू होण्याआधी दहा मिनीटाचा आनापान वर्ग घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते.
          "मित्र उपक्रम या मोबाईल अॅप मधील ऑडीओच्या द्वारे दहा मिनिटाचा आनापान वर्ग घेणार आहोत. जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे येथील शिक्षक मिलिंद जाधव यांनी सांगितले आहे ".
          यावर्गाचे नियोजन जाधव सह, नरसिंग पसनूरवार, कांचन जोशी हे करत आहेत. याकार्यक्रमाच्या वेळी विलास गायकवाड, शैला गुरव , रमेश खांडरे, मोहिणी बाचेवाड , बालाजी डुबे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages