रामदेव बाबावर कार्यवाही करावी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 November 2019

रामदेव बाबावर कार्यवाही करावी

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामदेव बाबावर कार्यवाही करावी - रिपाईची मागणी


 किनवट ( प्रतिनिधी ):
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पेरियार रामास्वामी नायकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांच्या पतंजली उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी रिपाइं ( आ.) चे तालुका अध्यक्ष विवेक ओंकार यांनी निवेदनाद्वारे आज (ता.२१) सर्व संबंधितांकडे केली आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पेरियार रामा स्वामी हे वैचारिक दहशतवादी आहेत,' ईश्वर मानणारे मूर्ख असतात' असे म्हणणाऱ्या पेरियार रामास्वामी चे अनुयायी वाढत आहेत, मी दलितात भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवाद विरोधात देशात कायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून काढून टाकले पाहिजे,असे वादग्रस्त मत व्यक्त करणारे बाबा रामदेव यांचा रिपाइं(आ.) जाहीर निषेध नोंदवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       डॉ. आंबेडकर व पेरियार रामास्वामी यांचे विचार देशाला उत्कर्षाकडे नेत असताना त्यांनाच वैचारीक दहशतवादी संबोधून योगगुरू रामदेवबाबा यांनी महापुरुषांचा घोर अपमान केला आहे .त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. म्हणून बाबा रामदेव यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांच्या पतंजली उत्पादनावर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या नावे लिहिलेल्या या निवेदनाची प्रत पोलीस ठाणे किनवट ला सुद्धा देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages