स्मार्ट गर्लस प्रशिक्षणात संविधान दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 November 2019

स्मार्ट गर्लस प्रशिक्षणात संविधान दिन साजरा

संविधानाची महामूल्य जनमानसात खोलवर रुजली तर भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. 
-प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने.

किनवट (प्रतिनिधी ) :
संविधानाच्या मुळाशी असलेले व्यापक असे मानवतावादी तत्वज्ञान, संविधानाने पुरस्कारिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, धर्मनिरपेक्षता, सहकार ही महामूल्य भारतीय जनमानसात खोलवर रुजली तर भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असे प्रतिपादन प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.
          मंगळवारी (दि. २६ ) सकाळी ११वाजता येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या स्मार्ट गर्ल प्रशिक्षणाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, उत्तम कानिंदे, गट साधन केंद्र समन्वयक संजय कांबळे, विषय तज्ज्ञ एस.एन. ब्राह्मण, बोलेनवार प्रमुख अतिथी होते.
          सावित्रीमाई फुले व राष्टूनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पार्पण करून वंदन केले. केंद्र प्रमुख श्रीमती भद्रे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेतले. उत्तम कानिंदे यांनी संविधान दिनाबद्दल विस्तृत माहिती दिली. मास्टर ट्रेनर वर्षा कुलकर्णी व शालिनी सेलूकर यांनी मनोगत व्यक्त केले.
          विषय तज्ज्ञ आशा येडे यांनी सूत्रसंचालन केले. डी.बी. मोगरकर यांनी आभार मानले. तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Pages