सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत जि.प. प्रा. कन्या शाळा येथे आयर्न गोळ्या वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 November 2019

सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत जि.प. प्रा. कन्या शाळा येथे आयर्न गोळ्या वाटप

सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत जि.प. प्रा. कन्या शाळा येथे आयर्न गोळ्या वाटप 

किनवट (प्रतिनिधी ) :
 जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, किनवट येथे अनिमिया मुक्त भारत निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आयर्न गोळ्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांचे हस्ते आयर्न गोळ्या वाटप करण्यात आल्या.
         यावेळी प्र.गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, केंद्रप्रमुख रमेश राठोड, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्रप्रमुख रमेश चौधरी व निवृत्त मुख्याध्यापक राम पवार, सामाजिक कार्यकर्ते शिवन्ना क्यातमवार, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, जी.जी. नैताम,पत्रकार मलिक चव्हाण, किरण ठाकरे व पोलिस काँस्टेबल पी.जी. बोदमवाड आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक जीवन गुरनुले,सहशिक्षक उमाकांत मॅकलवार, आयुब गंभीर शेख, अफजल चव्हाण, सुनिल इंगोले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages