किनवट येथे अत्यल्पवयीन मुलीसोबत कुकर्म ; सोळा वर्षीय मुलास पोलिसांनी केली अटक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 December 2019

किनवट येथे अत्यल्पवयीन मुलीसोबत कुकर्म ; सोळा वर्षीय मुलास पोलिसांनी केली अटक

किनवट येथे अत्यल्पवयीन मुलीसोबत कुकर्म ; सोळा वर्षीय मुलास पोलिसांनी केली अटक                        

किनवट  :   घराशेजारी राहणार्‍या एका अत्यल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करणार्‍या एका १६ वर्षीय मुलास पोलिसांनी गुरुवारी (दि.१९) सायंकाळी अटक केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.                                     

       शहराच्या इस्लामपुरा भागात राहाणारा शेख फकीर उर्फ सोनू शेख अकबर हा  गुरुवारी सकाळी घरात एकटाच होता. घराशेजारी राहाणारी एक चार वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे फकीर याच्या घरासमोर खेळण्यासाठी आली. त्यावेळी फकीर याने सदर मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. अत्याचाराने पिडीत मुलगी घरी गेल्यानंतर तिच्या आईने हा गंभीर प्रकार पाहून तीला त्वरित सरकारी दवाखान्यात हलविण्याच्या हालचाली केल्या. तत्पूर्वी पिडीत मुलीला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने, तिला गोकुंद्याच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

       पिडीत मुलिच्या आईने घरातील पुरुषमंडळी परतल्यानंतर रात्री उशीरा पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांनी आरोपीचा तत्काळ शोध घेतला आणि शहरातील हमाल कॉलनीतून आरोपीला ताब्यात घेऊन, प्रकरणाची चौकशी केली. पिडीत मुलीच्या जबाबानंतर रात्री उशिरा आरोपी शेख फकीर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे वृत्त कळताच किनवट पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. स्फोटक परिस्थिती लक्षांत घेऊन शहरात अतिरिक्त कूमक मागविण्यात आले. आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव पांगला. शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी पिडीत मुलीस व आरोपीस उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी नेल्याचे सूत्रांकडून कळाले.

No comments:

Post a Comment

Pages