खासदार हेमंत पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला खडसावले; तात्काळ स्वीकारले शेतकऱ्यांचे फॉर्म - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 December 2019

खासदार हेमंत पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला खडसावले; तात्काळ स्वीकारले शेतकऱ्यांचे फॉर्म

पीकविमा प्रश्नी खासदार हेमंत पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला खडसावले; तात्काळ स्वीकारले शेतकऱ्यांचे फॉर्म
------------------------------------------------

किनवट : जनतेच्या प्रश्नासाठी सदैव कार्यतत्पर असणारे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकरी पीकविमा  प्रश्नाबाबत बजाज अलायन्झ पीकविमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  रजत धर या अधिकाऱ्यास खडसावताच तात्काळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नाकारलेले अर्ज स्वीकारण्यात आले.

               हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात बजाज अलायन्झ या  पीकविमा कंपनीकडे विमा भरला होता पण जाणीवपूर्वक कंपनीने हिंगोली जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांचे अर्ज काही क्षुल्लक कारणावरून परत पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू नये असे कारनामे केले होते. यामुळे घाबरून गेलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित सीएससी  सेंटर चालकांकडे विचारणा केली पण सीएससी  सेंटरकडे सुद्धा याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे सर्वच जण गोंधळात पडले  यामुळे  शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान आणि कंपनीला करोडो रुपयाचा फायदा झाला.  एकीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे त्रस्त असताना दुसरीकडे या पीकविमा कंपनीनी विमा अर्ज नाकारून शेतकऱ्यांची  केलीली लुबाडणूक यामुळे शेतकरी हवालदिल  झाले होते. याबाबत जिल्ह्यातील सीएससी सेंटर चालकांच्या  शिष्टमंडळाने  हि बाब खासदार हेमंत पाटील यांना सांगताच खासदार हेमंत पाटील यांनी  क्षणाचाहि विलंब न लावता तात्काळ बजाज अलायन्झ कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रजत धर यांना धारेवर धरले. आणि  नाकारण्यात आलेल्या  शेतकऱ्यांचे  अर्ज तात्काळ स्वीकारण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता देण्यात यावा अन्यथा कार्यालयात घुसून धडा शिकवण्यात येईल असा सज्जड दम भरला .या घटनेचा परिणाम  अवघ्या २४ तासात दिसून आला .कंपनीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ,नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज  स्वीकारण्यास सुरवात केली यामुळे सर्वांच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे . मराठवाड्यात बजाज अलायन्झ हि कंपनी पीकविमा भरून घेण्याचे काम करते  गतवर्षी शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्याची  एकही घटना घडलेली नसताना  यंदाच्या खरीप हंगामात मात्र कंपनीने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते.

         खासदार   हेमंत पाटील यांनी सदैव शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य  दिले आहे,मागील पावसाळी आणि  हिवाळी अधिवेशनात देखील खासदार हेमंत पाटील यांनी  संसदेत पीकविमा प्रश्नाबाबत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले व मागणी केली होती,तसेच  शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये सहकारी बँका  शेतकऱ्यांची अडवणूक करता होत्या तेव्हा  सुद्धा बँकांनी   शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याबाबत इशारा दिला होता. या घटनेचे अनुकूल परिणाम दिसून आले होते .  आणि आता पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्याला खडसावून बाद केलेले अर्ज परत घेण्यास बजाज कंपनीला भाग पाडले.
अशी माहिती खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages