लाल बावट्याच्या वतीने देगलूर येथे धरणे आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 December 2019

लाल बावट्याच्या वतीने देगलूर येथे धरणे आंदोलन

नांदेड जिल्हा समितीच्या वतीने देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर  धरणे आंदोलन 

देगलूर जि. नांदेड:  महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) नांदेड जिल्हा समितीच्या वतीने देगलूरकर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर  धरणे आंदोलन करण्यात आले.
         आंदोलनात ग्रामीण भागातून मोठया प्रमाणावर शेतमजुरांची उपस्तिथी होती. उल्लेखनीय म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय होती. ग्रामीण गरीब शेतमजूरांच्या जगण्या-मरणाच्या प्रश्नावर हे आंदोलन करण्यात आले. देशभर लाल बावट्याच्या वतीने मनरेगा बचाव च्या मागणीसाठी कलेक्टर कार्यालयाच्या मार्फत,  मनरेगाच्या संबंधी विविध  मागण्यांबाबत हे निवेदन महाराष्ट्र शासनास  सादर करण्यात आले. या आंदोलनाच्या मुख्य मागण्यांमध्ये मुखेड व देगलूर तालुक्यात मागेल त्याला काम द्या, रोजगार हमीवर ६०० रुपये रोज द्या, मंजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा, मंडळाला भरीव आर्थिक तरतूद करा, रोजगार हमीच्या कामावर कायद्यानुसार सर्व सुविधा उपलब्ध करा, ६० वर्षावरील मजुरांना विनाअट तीन हजार रुपये पेंशन भत्ता द्या, मागेल त्याला रेशन व रेशनकार्डे उपलब्ध करून द्या,या व इतर स्थानिक मागण्यांना घेऊन ३ तास धरणे आंदोलन करण्यात आले, जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर मजुरांनी दणाणून सोडला.
        प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारायला कोणीही न आल्याने संघटनेने मजुरांसहित  उपजिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्तीने जाऊन, थेट कार्यालयात ठिय्या मांडला.घोषणांनी कार्यालयात तारांबळ उडाली. त्यामुळे, संघटनेच्या शिष्टमंडळाला उपजिल्हाधिका-यांनी चर्चेसाठी आत बोलावून घेऊन सविस्तर ३० मिनिटे चर्चा केली.स्थानिक प्रश्न लवकर सोडविले जातील व धोरणात्मक प्रश्न शासनाला कळवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतरच मजुरांचे समाधान होऊन, चर्चेची माहिती मजुरांना दिल्यानंतर यशस्वी आंदोलनाची सांगता झाली.
     
       आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गावकमिठ्या, तालुका समित्या,व जिल्हा समित्यांनी कार्य केले.या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष विनोद गोविंदवार, जिल्हा सचिव अंकुश अंबुलगेकर, शाहीर माधव देशटवाड, मंजुश्री कबाडे, सरुबाई सुर्वेसर, ताराकांत कोलाटे, रामराव यामावाड, पंढरी देशटवाड, पार्वती माली, सुनीता सुंकने, रेणुका तुरेवाड, माणिक गोणसेटवाड, शिवाजी देवकतें, अक्षय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages