शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० लाखाचा बळीराजा कृतज्ञता कोष प्रदान करणार... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 December 2019

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० लाखाचा बळीराजा कृतज्ञता कोष प्रदान करणार...

शरद पवारांचा १२ डिसेंबरला वाढदिवस ; राज्यभर सामाजिक कार्यक्रम घेवून साजरा केला जाणार...

८० लाखाचा बळीराजा कृतज्ञता कोष प्रदान करणार...

मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर २०१९ रोजी असून यावर्षी पक्षाच्यावतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करणार आहे. शिवाय बळीराजा कृतज्ञता कोष तयार करुन ८० वर्षात पदार्पण करत असल्याने ८० लाखाचा कोष सुपुर्द केला जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कडून शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.

राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार असून अशाप्रकारचा वर्षभर हा कार्यक्रम होणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

१२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शरद पवार आलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. लोकांनी आणलेले पुष्पगुच्छ, पुष्पहार पवारसाहेब स्वीकारणार नाहीत. तो निधी कृतज्ञता कोषात जमा केला जाणार आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम देण्यात आला आहे.

युवकाच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विकास आणि परिवर्तनाचा महानेता या विषयावर घेतली जाणार आहे.

शिवाय संपुर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्यावतीने ११ ते २० डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages