किनवट : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा (ता.किनवट) येथे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा नुकताच घेण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतन चे उपप्राचार्य तथा स्थापत्य विभाग प्रमुख प्रकाश डी. पोपळे, प्रा. एल. टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रकाश पोपळे यांनी इयत्ता दहावी नंतर शासकीय तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध पदविका असुन त्यासाठी असणारी प्रवेश प्रक्रिया, एकुण जागा, लागणारी फीस, इतर सोयी सुविधा-अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका, निवास व्यवस्था, शिष्यवृत्ती इत्यादी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले प्रारंभी पर्यवेक्षक शेख हैदर यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन महेंद्र नरवाडे यांनी केले. इयत्ता दहावी च्या ३५० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इयत्ता दहावी चे सर्व वर्ग शिक्षक प्रशांत डवरे, मुकुंद मुनेश्वर, प्रज्ञा पाटील, राजकुमार दवने, सागर बोलेनवार, तुळशीराम वाडगुरे, गौतम दामोदर, सुभाष सुर्यवंशी व पर्यवेक्षक किशोर डांगे यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment