संविधान विरोधी नागरिकत्व संशोशन कायदा विरोधात किनवट येथे धरने आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 December 2019

संविधान विरोधी नागरिकत्व संशोशन कायदा विरोधात किनवट येथे धरने आंदोलन


संविधान विरोधी नागरिकत्व संशोशन कायदा विरोधात किनवट येथे धरणे आंदोलन

किनवट : संविधान विरोधी व धर्मावर आधारित नागरिकत्व संशोधन कायदा परत घ्या,या प्रमुख मागणीसह अन्य कांही मागण्यांसाठी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने आज(दि.१९) सकाळी ११ वाजता उपविभागिय अधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.यात जवळपास हजाराच्या वर लोकांनी सहभाग नोंदविला.

   धरणे आंदोलनाचे संयोजक तथा मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य अर्जुन आडे यांच्यासह धरणे आंदोलनाचे संचालन अध्यक्ष मंडळाचे सदस्य माजी आमदार प्रदिप नाईक,  माजी नगराध्यक्ष इसाखान,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, अब्दुल्ला चाऊस,अॅड.सुभाष ताजने,प्रा.किशनराव किनवटकर,सुरेखा काळे यांनी केले.

    धरणे आंदोलना नंतर उपविभागिय अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावळी काॅ.शेख चांद शेखजी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,अनिल क-हाळे, प्रभाकर बोड्डेवार,युसुफ खान, गंगुबाई परेकार,शेख प्रविण,अॅड.टी.एच.कुरेशी,अॅड.मिलिंद सर्पे,दिलिप पाटील,अभय महाजन यांच्यासह हजाराच्या वर कार्यकर्ते सहभागी झाले होते ‌.

No comments:

Post a Comment

Pages