भारतीय संविधानात सर्वात जास्त मानवधिकारांचा समावेश -न्यायाधिश पठाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 December 2019

भारतीय संविधानात सर्वात जास्त मानवधिकारांचा समावेश -न्यायाधिश पठाण


भारतीय संविधानात सर्वात जास्त मानवधिकारांचा समावेश 
-न्यायाधिश जहांगीर पठाण 

किनवट : भारतीय संविधानात सर्वात जास्त मानवधिकारांचा समावेश करण्यात आला आहे . अटक का करण्यात आली आहे, हे विचारण्याचा, जमातीसाठी वकील लावण्याचा अधिकार मानवाधिकार कायद्यात आहे. २४ तासांपेक्षा जास्त आरोपींना अटकेत ठेवता येत नाही, त्यांना न्यायालयात हजर करावे लागते. एका गुन्ह्यात एकदाच शिक्षा देता येते. प्रतेकांनाच मानव अधिकार असतात. समोरच्या व्यक्तिलाही मानव अधिकार असतात,याची जाणीव प्रत्येकांनी ठेवावी.  विद्यार्थ्यांनी मोबाईचा वापर  जरुर करावा , परंतु तो विधायक कामांसाठी करावा, भारतीय संविधानाचे वाचन करावे,असा कानमंत्र न्यायमुर्ती जहांगीर पठाण यांनी दिला .

         तालुका विधी सेवा समिती व न्यायालय अभिवक्ता संघाच्या वतीने गोकुंदा (ता.किनवट) येथिल महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात "मानव अधिकार " व "मनोधैर्य योजना" या विषयावर कायदेविषय शिबीर आज(दि.१९) सकाळी ९ वाजता घेण्यात आले.या शिबिराचा अध्यक्षिय  समारोप करतांना ते बोलत होते.

          यावेळी बोलतांना न्यायमुर्ती  जे.एन.जाधव म्हणाले की, "सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनि केलेले कामे यांचा समावेश मानव अधिकारातच होतो". न्यायालय अभिवक्ता संघाचे सहसचिव अॅड.राहुल सोनकांबळे  यांनी मानव अधिकार या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, "हैदराबाद येथे पिडित युवतीवर झालेला बलात्कार म्हणजे तिचा पहिला खून आहे,तर तिला जाळून मारणे म्हणजेच तिचा दुसरा खून आहे.तसेच या प्रकरणातील  चार आरोपिंचा एन्काऊंटर करणे म्हणजे मानव अधिकाराचा खूनच आहे.या प्रकरणाचे कुणीही समर्थ करु नये".

         मंचावर मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके,न्यायालय अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे, प्राचार्य राजाराम वाघमारे, अॅड.सुनिल येरेकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक न्यायालय अभिवक्ता संघाचे सचिव अॅड.दिलीप काळे यांनी केले. यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री.मिसलवार,एस.डी. चौव्हाण यांनी पुढाकार घेतला. यावेळी विद्यार्थी,  विद्यार्थिनींची उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Pages