छोट्या बाळाचे अपहरण करणारी महिला किनवट पोलिसांच्या ताब्यात
किनवट : ठाणे जिल्ह्यातील नवघर येथून एका पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण करून आणलेल्या एका महिलेला किनवट पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून बोधडी(ता.किनवट) येथे जाऊन शिताफीने त्या बाळासह अपहरणकर्ती महिलेला ताब्यात घेतले आहे. सदर घटना आज गुरूवारी (दि.१९) दुपारी घडलेली आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवघर जि.ठाणे येथील एक महिला आपल्या अभयसिंग नावाच्या पाच महिन्याच्या बाळाला संगिता भारद्वाज (वय २५ ) व तिचा नवरा सुनिल उर्फ सोनू भारद्वाज यांना सांभाळण्यासाठी देऊन नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती. मात्र संगिता व सोनू यांनी सदर बाळाचे अपहरण करून त्यास पळवून नेले, अशा आशयाची तक्रार त्या बाळाच्या आईने नवघर येथील ठाण्यात दिल्यावरून या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पो.स्टे.नवघर येथील अधिकार्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, किनवट पोलिसांनी बोधडी बुद्रुक येथे तातडीने जाऊन आरोपी संगिता हीस ताब्यात घेऊन त्या बाळाची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आरोपी व बाळास ठाणे येथील पोलिसांच्या हवाली केले. आरोपी सुनील उर्फ सोनू यास नवघर पोलिसांनी पूर्वीच ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून समजले.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पो.अधीक्षक विजय पवार व उपविभागीय अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पो.स्टे.येथील सपोनि विजयकुमार कांबळे, पो.कॉ.तथा वाहनचालक गडपवार, महिला पो.कॉ.अनिता गजलवाड, होमगार्ड सय्यद फेरोजअली, सुरेश माने व महिला होमगार्ड ज्योती पिसलवार यांनी पार पाडली.
Friday 20 December 2019
छोट्या बाळाचे अपहरण करणारी महिला किनवट पोलिसांच्या ताब्यात
Tags
# राज्य
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
राज्य
Labels:
राज्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment