उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.नलिनी टेंभेकर यांचे स्वाभिमानी मुप्टा संघटनेकडून सत्कार
नांदेड : येथील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक पदी नवनियुक्त डॉ. नलिनी टेंभेकर यांचे स्वाभिमानी मुप्टा या प्राध्यापक संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले. डॉक्टर नलिनी टेंभेकर यांनी नांदेड येथील उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालक पदाचा आज कार्यभार स्वीकारला. त्यावेळी स्वाभिमानी मुप्टा तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वाभिमानी मुप्टा तर्फे यावेळी करण्यात आलेल्या सत्कार समारंभात स्वाभिमानी मुप्टाचे विभागीय अध्यक्ष डॉ. शेखर घुंगरवार यांनी सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयात रुजू झालेल्या डॉ.नलिनी टेंभेकर यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले.
या प्रसंगी स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे प्रा. डॉ. शेखर घुंगरवार, वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शेळके, प्राचार्य डॉक्टर एस एच गोणे, प्राचार्य विकास कदम, डॉक्टर शेख शहनाज, डॉ. रत्नमाला धुळे, डॉ. गणेश ईजळकर, प्रा. डॉ. भारत कचरे, डॉ. रवी धुळे, प्रा.नम्रता वावळे, डॉ. रजिया शेख, प्रा. डॉ.मेघराज कपूर, प्रा. डॉ. ज्ञानेश आझादे, प्रा. डी. आर. गच्चे, प्रा. डॉ. डी. वाय. रणवीर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment