आंबेडकरी तरुणांनी ठेवला समग्र समाजासमोर आदर्श - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 January 2020

आंबेडकरी तरुणांनी ठेवला समग्र समाजासमोर आदर्शआंबेडकरी तरुणांनी ठेवला समग्र समाजासमोर आदर्श 

पुणे : आंबेडकरवादी युवा तर्फे
भीमा कोरेगाव येथील जयस्तंभ परिसरात संत गाडगेबाबा शौर्यभूमी स्वछता अभियान सम्पन्न
         
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे मानवंदना  देण्यासाठी राज्यभरातून  तसेच भिमानुयायी येत असतात .येथे येणाऱ्या भीमसैनिकांची   त्यांच्या जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते .

त्या ठिकाणी  होणाऱ्या कचऱ्या वर कुणी लक्ष देत नाही .आंबेडकर युवा संघा तर्फे या ठिकाणी संत गाडगेबाबा स्वछता अभियान राबविण्यात आले होते.तारिख दोन जानेवारी रोजी शूरवीरांना मानवंदना देऊन सर्व स्वयंसेवकांनी भीमा कोरेगाव जयस्थंभ परिसर स्वच्छ केला .  हे अभियान यशस्वी करण्यासाठी आबेडकरी युवा संघाचे शिल्पकार नरवाडे ,सुनील धुतराज यांच्यासह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

भीमा कोरेगांवला ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ क्रांतीस्तंभ उभारण्यात आला. या क्रांतीस्तंभाला राज्यभरातून लाखो लोक भेट द्यायला येत असतात.आंबेडकरी युवा संघ या संघटनेच्यावतीने यंदा 2 जानेवारीला संत गाडगेबाबा स्वच्छता उपक्रम २०२० राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अंतर्गत भीमा कोरेगांव क्रांतीस्तंभ परिसर स्वच्छ करण्यात आला. 
या संघटनेचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages