साने गुरुजी ईमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचा कोनशिला समारंभ १२ जानेवारीला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 January 2020

साने गुरुजी ईमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचा कोनशिला समारंभ १२ जानेवारीला


साने गुरुजी ईमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचा कोनशिला समारंभ १२ जानेवारीला


किनवट : भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी ईमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचा कोनशिला समारंभ रविवारी (दि.१२)एम. आय.डी.सी.नांदेड रोड, कोठारी (ता.किनवट) येथे डाॅ.प्रकाशभाऊ व डाॅ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते व डाॅ.विकासभाऊ व डाॅ.भारत आमटे यांच्या विशेष उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी बजाज ऑटो लिमिटेड चे प्रतिनिधी, एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन,पुणे चे सचिव प्रा.सुभाष वारे व दै.लोकसत्ताच्या सर्वे कार्येषु या उपक्रमाचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साडे दहा वाजता माहूर रस्त्यावरील कलावती गार्डन येथे सांस्कृतिक कार्यक्रम व अकरा वाजता स्वागत व मनोगताचा मुख्य कार्यक्रम होईल, अशी माहिती साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख व भारत जोडो युवा अकादमी चे अध्यक्ष डाॅ.अशोक बेलखोडे यांनी दिली.

यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.भागवत कराड, आमदार भीमराव केराम,माजी खासदार व्यंकटेश काब्दे, डाॅ.तुषाबा शिंदे (भारतीय रेल्वे सेवा), डाॅ.राजीव बोरले (कुलसचिव, द.मे आयुर्विज्ञान) , सर्व सेवा संघाचे विश्वस्त डाॅ.सोमनाथ रोडे,व माजी आमदार पंडितराव देशमुख, वैद्यकीय महाविद्यालय, लातुरचे अधिष्ठाता डाॅ.नवाब मलिक, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.बालाजी शिंदे, सह्याद्री वाहिनीचे निर्माते दत्तराज पाठारे, डाॅ.सुरेश कदम (अध्यक्ष,आय.ए.एम., नांदेड), सर्पदंश उपचार तज्ज्ञ डाॅ.दिलीप पुंडे,भारत जोडो संघटक व्यंकट रमनय्या (हैदराबाद), नाम फाउंडेशन चे जिल्हा संघटक डाॅ.बालाजी कोंपलवार, डाॅ.शिरीष पत्की (अध्यक्ष,डाॅक्टर असोसिएशन) , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, डाॅ.वेदप्रकाश मिश्रा (प्रभारी कुलपती, द.मे.आयुर्विज्ञान, वर्धा), माजी आमदार प्रदिप नाईक, एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माहिती उपसंचालक मोहन राठोड (पुणे), हॅलो मेडिकल फाउंडेशन चे सचिव डॉ.विजय गायकवाड, दूरदर्शन, दिल्लीचे माजी महानिर्देशक अरुणम सकट, हेमंत चौधरी (संस्थापक अध्यक्ष,वसई वि.स. बॅंक), वास्तुविशारद गोविंद पुरोहित, यशवंत हांडे (मानव संसाधन सल्लागार, नागपूर), संपादक शंतनु डोईफोडे, भारत जोडो सायकल यात्री नफिसा कोलोंबोवाला व अजय , राष्ट्र सेवा दलाचे प्रा.डाॅ.अशोक सिद्देवाड,प्रयास सेवांकुर चे डाॅ.अविनाश सावजी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम गटलेवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवाराने केले आहे.
 ‌‌‌‌‌‌‌

No comments:

Post a Comment

Pages