चिखली बुजुर्ग येथे वनविभागाची धाडसी कार्यवाही; १,१४,६२५ रुपये किमंतीचा मूद्देमाल जप्त करण्यात यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 January 2020

चिखली बुजुर्ग येथे वनविभागाची धाडसी कार्यवाही; १,१४,६२५ रुपये किमंतीचा मूद्देमाल जप्त करण्यात यश



चिखली बुजुर्ग येथे वनविभागाची धाडसी कार्यवाही; १,१४,६२५ रुपये किमंतीचा मूद्देमाल जप्त करण्यात यश 

किनवट : सागवान तस्करी साठी  कूप्रसिद्ध असलेल्या चिखली बुजुर्ग (ता.किनवट) या गावी वन विभागाने आज (दि.७) पहाटे साडे सहा वाजेच्या दरम्यान मोठ्या फौजफाट्यासह  धडक कारवाई केली. या कारवाईत वन विभागाने १,१४,६२५ रुपये किमंतीचा मूद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले.

         वन विभागाच्या या कारवाईला महसूल विभागाची पण साथ मिळाली होती .सागवान तस्करी साठी कूप्रसिद्ध असलेल्या चिखली या गावात नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा .वनसंरक्षक (जकांस ) व्ही. एन . गायकवाड यांच्या नेतृत्वात  व महसूल विभागाचे नायब तहसीलदार मेश्राम यांच्या सहकार्याने  किनवट  ,इस्लापूर अप्पारावपेठ, बोधडी ,मांडवी व माहूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने पहाटे सकाळी साडेसहा वाजता चिखली बुजुर्ग येथे अचानक धाड टाकली. वन विभागाच्या  या धाडीत  घरांच्या परिसरामध्ये व  गाव शिवारामध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला सागवान कट साईज व गोल नग मिळाला . यात सागवानाचे कटसाईज १५७ नग ज्यांचे घनमीटर १.२२५ ज्यांची अंदाजे किंमत  ७६३१९ रुपये तसेच सागी गोल नग ३७ ज्यांचे घन मीटर  ०.८२० किंमत ३८ हजार ३०६ रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .

    वन विभागाने सदरील अवैध माल जप्त करुन राजगड आगरावर रवानगी केली आहे .वनविभागाच्या ज्या  पथकाने धाड मारली त्या  पथकात किनवटचे वनपरिक्षेत्राधिकारी के .एन. खंदारे , फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार ,मांडवी चे वनपरिक्षेत्राधिकारी ए .जी. तायनाक , माहूर चे बी .पी. आडे,  बोधडीचे एस .जाधव, इस्लापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे,अप्पारावपेठचे वनपरिक्षेत्राधिकारी चौबे , वनपाल के.जी गायकवाड, आर .एन.सोनकांबळे ,एस. एन सांगळे ,मोकले ,याकूब, बी .टी जाधव यासोबतच इतर वनाधिकारी वनरक्षक वनमजूर वाहन चालक भूतणार ,आवळे ,आनंदा यांचा सहभाग होता .

No comments:

Post a Comment

Pages