सुमित गजभारे 'मानवी अधिकार ' विषयात नेट उत्तीर्ण
किनवट :
येथिल भगतसिंग नगरातील सुमित यशवंतराव गजभारे हा विद्यार्थी डिसेंबर २०१९ मध्ये यु.जी.सी.मार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत 'मानवी अधिकार'या विषयात उत्तीर्ण झाला आहे.
या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कुल आॅफ सोशल सायन्स चे संचालक डाॅ.ए.आय.शेख, डाॅ.जी.एस.ऐलाने, डाॅ.बाबूराव जाधव, डाॅ.प्रशांत घोडवाडिकर, डाॅ.तात्याराव पवळे, गौतम कदम, शेख अजिम, किनवट न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment