क्रांतीज्योती सावित्रिआई जोतीराव फुले जयंती निमित्त ११ जानेवारीला प्रा.नागेश गवळी यांचे व्याख्यान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 8 January 2020

क्रांतीज्योती सावित्रिआई जोतीराव फुले जयंती निमित्त ११ जानेवारीला प्रा.नागेश गवळी यांचे व्याख्यान


क्रांतीज्योती सावित्रिआई जोतीराव फुले जयंती निमित्त ११ जानेवारीला प्रा.नागेश गवळी यांचे व्याख्यान


किनवट : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या भारताच्या पहिल्या शिक्षिका, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रिआई जोतीराव फुले यांचा १८९ वा जयंती सोहळा दि.११ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील महात्मा फुले चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त माळी समाज बांधव, किनवट-माहूरच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य ज्योतीबादादा खराटे हे राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत पाटील, माजी खासदार राजीव सातव, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक, माजी मंत्री डी.बी.पाटील, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, औरंगाबादचे सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाळे, अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश हिराळकर, अ.भा.माळी महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण गिहे, अभियंता प्रशांत ठमके, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, म.फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनिल बेहरे, अ.भा.माळी महासंघ तेलंगाणाचे प्रांताध्यक्ष सुकूमार पेटकुले, ऍड. खुशाल शेंडे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे हे राहणार आहेत.

सावित्रीआई फुले यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते, अहमदनगर येथील बहूजन विचारांची तोफ असणारे, समग्र फुले जीवन चारित्र्याचे व्याख्याते प्रा.नागेश गवळी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.समस्त फुले प्रेमींनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन संजय गुरनुले, प्रल्हाद सातव व समस्त माळी समाज बांधव, किनवट माहूरच्या वतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages