नांदेडच्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने मिळाला मोठा दिलासा; जमिनीच्या फेरफार नोंदी झाल्या अद्ययावत
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आत्मीयतेने दखल घेतलेल्या त्या शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीवरील कर्ज नोंदीमुळे फेरफार न झाल्याने जाधव यांचा मोठा व्यवहार अडला होता. त्यावर त्यांनी मुंबईत येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळाली. जाधव यांनी आपल्या जमिनीचा व्यवहार आणि कर्ज याबाबत माहिती दिली. त्याही व्यग्रतेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवेदनशीलतेने परिस्थिती जाणून घेतली. जाधव यांना निराश होऊ नये, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणा आणि महसूल अधिकारी यांना निर्देश दिले. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणेसह जाधव व संबंधित बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधला. जाधव यांच्या प्रकरणातील वस्तुनिष्ठता तपासून जमीन विक्री प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे निर्देश दिले. या फेरफारीमुळे जाधव यांना यापुढे कर्ज फेडीसह शेतीविषयक कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे एका शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment