भारतीय बौद्ध महासभा,शाखा अंबाडी (रेल्वे स्टेशन,ता.किनवट)च्या वतीने बुधवारी (दि.२६) महान संत चिमणाजी महाराज यांची ८३ वी पुण्यतिथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 February 2020

भारतीय बौद्ध महासभा,शाखा अंबाडी (रेल्वे स्टेशन,ता.किनवट)च्या वतीने बुधवारी (दि.२६) महान संत चिमणाजी महाराज यांची ८३ वी पुण्यतिथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन


 भारतीय बौद्ध महासभा,शाखा अंबाडी (रेल्वे स्टेशन,ता.किनवट)च्या वतीने बुधवारी (दि.२६) महान संत चिमणाजी महाराज यांची ८३ वी पुण्यतिथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन


किनवट  : भारतीय बौद्ध महासभा,शाखा अंबाडी (रेल्वे स्टेशन,ता.किनवट)च्या वतीने बुधवारी (दि.२६) महान संत चिमणाजी महाराज यांची ८३ वी पुण्यतिथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   पहिल्या सत्रात सकाळी साडे नऊ वाजता सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे रोहन होईल.दुस-या सत्रात दुपारी चार ते सात या वेळेत भोजनदान होईल.तिस-या सत्रात सायंकाळी पाच ते सात यावेळेत झेन मास्टर भिक्कू शाकु बोधीधम्मा,तामसी(आदिलाबाद, तेलंगाना)
यांची धम्मदेसना होईल‌.चौथ्या सत्रात  सायंकाळी सात ते नऊ यावेळेत वसंत हंकारे यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री नऊ वाजेपासून संविधान मनोहरे (अमरावती) व धम्मज्योती शिंदे (मुंबई) यांचा बुद्ध व भीम गितांचा दणदणीत मुकाबला होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तामगाडगे,उमेश भवरे व पंकज भवरे हे करतील. कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी (ता.२७)सकाळी नऊ वाजता करण्यात येईल.
   उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, शाखाध्यक्ष सतिष गिरीधर पाटील, विशाल हलवले,विद्याधर तामगाडगे,शेंदूपान मुनेश्वर,राहुल कयापाक,कोमलदास भवरे,किशन मुनेश्वर,श्रावण घुले,सम्यक मुनेश्वर, विलास कानिंदे,कपिल हलवले यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा,रमाई महीला संघ,नवयुवक मित्र संघ,शाखा अंबाडी च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages