जमते–इस्लामी-हिंद शाखेच्या वतीने राशन किट चे वितरण गरिबांना मदत करण्याचे आव्हान! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 March 2020

जमते–इस्लामी-हिंद शाखेच्या वतीने राशन किट चे वितरण गरिबांना मदत करण्याचे आव्हान!


माहूर : ‘कोरोना’ लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे दिनांक 27 मार्च रोजी गोरगरिबांना व मजुरांना राशन किटचे वितरण करण्यात आले.ज्यांचे हातावर पोट असून त्यांनी मोल मजुरी केल्याशिवाय त्यांना भकर मिळत नाही.अशा गरीब कुटुंबांना जेवनाची सोय व्हावी या उद्दशाने या परिसरातील जमाते-   इस्लामी-हिंद शाखे च्या वतीने राशन किट चे वितरण करण्यात आले आहे.
   संपूर्ण भारत देशात लॉक डाऊन च्या स्थितीत असताना कुणालाही बाहेर पडण्याचे अनुमती नाही.कलम 144 च्या अनुषंगाने सर्वत्र कर्फ्यु घोषित आहे.कोरोनाव्हायरस च्या दहशतीने लोकांनी बाहेर पडण्याचा विचार करणे म्हणजे धोक्याची घंटा,सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे लोकांना फक्त जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना दिसून येत आहे. गोरगरिबांना मजुरीला ही जाता येत नाही. त्यातच गोरगरिबांची सेवा म्हणून आपापल्या गावातून अशीच गोरगरिबांची सेवा घडवावी.या हेतू ने
जमाते–इस्लामी–हिंद शाखा गोंड वडसा यांनी केलेल्या आव्हानाच्या अनुषंगाने  दिनांक 27 मार्च रोजी  गोंडवाडसा (ता.माहूर) येथे गरजू लाभार्थ्यांना,मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या मजुरांना जमाते–इस्लामी–हिंद यांच्या माध्यमातून राशन किट चे वितरण तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर व सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या हस्ते जमाते–इस्लामी–हिंद गोंडवडसा शाखेच्या कार्यकर्ते डॉ. मोफिक खान,अध्यक्ष शेख फारुक यांच्या सह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राशन किट वितरित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या पूर्वीच संपूर्ण नागरिकांना आहवान करण्यात आले होते की,या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची गरज नसून या स्वरूपाचे कार्यक्रम आपल्या गावात देखील राबविल्यास जे कुटुंब समोर येऊन आपल्या हाल-अपेष्टा सांगू शकत नाही.त्यांच्या घरापर्यंत अशा प्रकारे अन्नधान्याची किट पोहोचून एक छोटीशी मदत आपण करूया असा निर्धार करावा, अशी विनंती करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Pages