बेवारसांना कमल फाऊंडेशन चा आधार कोरोनाचे संकट: भुकेल्याना दिले जात आहे जेवण,उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 March 2020

बेवारसांना कमल फाऊंडेशन चा आधार कोरोनाचे संकट: भुकेल्याना दिले जात आहे जेवण,उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक

बेवारसांना कमल फाऊंडेशन चा आधार
 कोरोनाचे संकट: भुकेल्याना दिले  जात आहे जेवण,उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक

नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्गात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.त्यातच पंतप्रधानांनी 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉक डाऊन लागू केल्यामुळे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.याचा परिणाम शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मनोरुग्ण व अपंग ,निराधारांवर झाला असून भूक भागविण्यासाठी अन्न मिळेनासे झाले होते.
त्यांना कमल फाऊंडेशन च्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला आहे .
                  मागील काही महिन्यापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव देहभरासह राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे .कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये यासाठी,राज्यशासनाने दि 31 मार्च पर्यंत सनचारबंदी  लागू केली आहे .त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहे .
      त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट
असल्याने फुटपाथ, रेल्वे ,बसस्थानक परिसरात राहणाऱ्या व अपंग अशा निराधारांना एकवेळच्या जेवणासाठी दाहिदिशा फिरावे लागत आहे ;परंतु परंतु पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे .आपण समाजाचे काहीतरी देने लागतो या भावनेने शहरातील कमल फाऊंडेशन च्या वतीने 24 मार्च पासून या भुकेल्या  निराधारांची रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात येऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करण्यात येत आहे .या कामासाठी कमल फाऊंडेशन चे अमरदीप गोधने ,बुद्धभूषण सोनसळे ,दत्त घोगरे व साई कदम हे परिश्रम घेत आहेत.


मागील तीन चार दिवसांपासून शहरातील अनेक ठीक ठिकाणच्या भागात आढळणाऱ्या मनोरुग्ण व अपंग ,निराधारांना  पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत होती .त्यामुळे आम्ही रात्रीचे जेवण वाटप करून निराधरांना आधार देण्याचे काम करत आहोत.- अमरदिप गोधने

No comments:

Post a Comment

Pages